संचालकांच्या लेखणीतून...
स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात जेव्हा मी स्वतः विद्यार्थिदशेतून अधिकारी पदापर्यंत वाटचाल केली, तेव्हा बर्याच गोष्टी शिकत आणि अनुभवत गेलो.
कधी पडलो, धडपडलो तर कधी पुन्हा नव्या जोमाने उभा देखील राहिलो. फक्त त्यासाठी संयम ठेवला.
विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा या क्षेत्रात पाऊल ठेवतात, तेव्हा ते नव्या उमेदीने, उर्जेने आपलं पॅशन घेऊन आलेले असतात. पण त्यांची ही ऊर्जा, उमेद शेवटपर्यंत म्हणजेच यश पदरात पडेपर्यंत टिकवणं तेवढंच कठीण असतं. याच सळसळत्या रक्ताच्या वयात त्यांच्या स्वप्नांना आकार देणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं आहे. इथे संयम ठेवणं हेही तितकच गरजेचं आहे. कारण ही विद्यार्थ्यांच्या संयम आणि सातत्याची परीक्षा आहे. या सर्व गोष्टींची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्याच आग्रहास्तव ही चळवळ उभी करण्याचा हा मानस.
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मार्गदर्शन असणे किती गरजेचे? त्यात अकॅडमीची साथ महत्त्वाची असते की नाही? हा आज पर्यंत या क्षेत्रात चर्चिला जाणारा महत्त्वाचा प्रश्न. तयारी करणार्या प्रत्येकाच्या मनाला सर्वात जास्त भावलेला प्रश्न. आपल्याला मिळणाऱ्या यशात क्लासेसचे किती महत्त्व आहे किंवा क्लास लावल्यानंतरच यशाच्या जवळ जाऊ शकतो, याला उत्तर नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नात दर्जेदार क्लासेसची साथ असेल व विद्यार्थ्यांना त्या क्लासेसची गरज यात योग्य ताळमेळ असेल तर यश चालून येऊ शकते, या मतानुरूप ‘विजयपथ’ ची दिशा नक्कीच उगवती असेल अशी खात्री द्यावीशी वाटते.
खरेतर, अनेक विद्यार्थी अगदी लहान असल्यापासून स्पर्धा परीक्षेच्या दुनियेत येण्यासाठी प्रेरित असतात. आता यात फक्त शहरी टक्काच नाही तर ग्रामीण टक्काही वाढत आहे. ग्रामीण भागातील अनेक मुले तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. येथे आल्यानंतर अनेक प्रलोभनांना बळी पडत जातात. परिणामी यश सातत्याने हुलकावणी देत असते. या सर्व समस्यांचा पाढा ‘विजयपथ’ ला नक्कीच माहित आहे कारण मी स्वतः जेव्हा विद्यार्थिदशेतून अधिकारी पदापर्यंत पोहोचताना तावून-सुलाखून निघून यश प्राप्ती केली, तेव्हा या सर्व गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता व ‘विजयपथ’ची परिपक्वता या दोन्ही गोष्टींची उच्च परिपूर्णता राखण्याचा Academy चा नेहमीच मानस असेल.
विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून वैयक्तिक पातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याचे कर्तव्य समजून त्यांच्यापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कारण विद्यार्थ्यांना आलेले Doubts लगेच Clear करून पुढील अडथळ्यांची शर्यत पार करण्यात खरा आनंद आहे. अभ्यासक्रमानुसार मुलभूत संकल्पना स्पष्ट करून पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यावर विशेष लक्ष देऊन घोडदौड चालू असेल.
स्पर्धा परीक्षांचा आवाका हा खूप मोठा आहे. इथे परिपूर्ण असलेला विद्यार्थी यशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. स्पर्धा परीक्षेची पद्धत सातत्याने बदलते आहे. वेगवेगळ्या योजनांची जंत्री आयोग वापरत आहे. येथे अभ्यासक्रम जरी ठराविक चौकटीत बसवून मर्यादित दिलेला असला तरी आयोग अलीकडे प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत वरचेवर बदल करत आहे. त्यानुसार आपण आपली अभ्यास करण्याची व त्याचबरोबर Notes Making ची पद्धत बदलून ती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. या बदलांशी विद्यार्थ्यांनी व Academy ने जुळवून घेणे आता क्रमप्राप्त आहे. या सर्व परिणामांची जाणीव ठेवूनच ‘विजयपथ’ ची वाटचाल नक्कीच आयोगाजवळ जाण्याचा एक स्वच्छ मार्ग राहील, हे आश्वासन देताना अभिमान वाटतो.
ध्येयपूर्तीकडे वाटचाल करत त्या ध्येयावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवायला आम्ही सदैव तत्पर आहोत.
फक्त
एक
लक्षात
ठेवा
क्षेत्र
कोणतेही
असो,
आयुष्यात
कष्टाला
पर्याय
नाही
;
आणि
कष्ट
प्रामाणिक
असले,
की
यशालाही
पर्याय
नाही…